पुढील होणारे कार्यक्रम

परभणी जिल्ह्यातील जनतेसाठी शिवसेनेच्या विकासनितीचा आराखडा

परभणी जिल्ह्यातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवसेना तळागाळातील लोकांना सर्व क्षेत्रात मदत करण्यास कटिबद्ध आहे. या धोरणाअंतर्गत खालील महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.

१. कृषी आणि शेतकरी विकास :-

  • शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजावर कर्ज योजना.

  • पाणीटंचाई समस्येवर स्थायी उपाययोजना.

  • शेतमालास हमीभाव आणि थेट बाजारपेठ जोडणी.

  • आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्रे.

२. रोजगार आणि उद्योजकता वाढ

  • तरुणांसाठी स्टार्टअप आणि लघुउद्योग धोरण.

  • स्वयंरोजगार प्रकल्पांसाठी व्याजमुक्त कर्ज आणि अनुदाने.

  • महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि कर्जसहाय्य.

  • ग्रामीण भागात लघुउद्योग केंद्रांची उभारणी.

३. शिक्षण आणि कौशल्यविकास

  • मोफत आणि दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा वाढवणे.

  • डिजिटल शिक्षणासाठी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम.

  • विद्यार्थी व तरुणांना कौशल्यविकास प्रशिक्षण आणि सरकारी अनुदाने.

  • ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणसंस्था स्थापन करणे.

४. आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याण

  • प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि औषध पुरवठा.

  • गरीब व गरजूंसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार.

  • मातृत्व आणि बाल संगोपनासाठी विशेष आरोग्य योजना.

  • रुग्णवाहिका सेवा आणि मोफत आरोग्य शिबिरे.

५. पायाभूत सुविधा आणि नागरी विकास

  • गावागावांमध्ये सुसज्ज रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा.

  • शहरी भागात स्वच्छता आणि आधुनिक नागरी सुविधा.

  • जलसंधारण आणि पर्यावरणपूरक प्रकल्प राबवणे.

  • परभणीच्या संपूर्ण विकासासाठी दीर्घकालीन मास्टर प्लॅन.

६. महिलांचा सशक्तिकरण आणि सुरक्षा

  • महिला बचतगटांना अनुदान आणि आर्थिक मदत.

  • स्वावलंबनासाठी विशेष महिला उद्योजकता योजना.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय:-

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन !

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी श्री. मदनजी रेनगडे पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख, परभणी यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प केला आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्दिष्ट:

✅ शेतीमालास योग्य बाजारपेठ मिळवून देणे.

✅ शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न.

✅ सामूहिक खरेदी-विक्री प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा नफा वाढवणे.

✅ सेंद्रीय आणि आधुनिक शेतीला चालना देणे.

✅ शेतीसंबंधित प्रक्रिया उद्योग उभारणे आणि स्थानिक रोजगार निर्माण करणे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी!

➡ आता आपला माल थेट विक्रीसाठी उपलब्ध होईल!

➡ शासकीय योजना आणि अनुदान थेट शेतकऱ्यांच्या हाती !

➡ एकत्रित शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत!

"शेतकऱ्यांच्या हक्कासाठी – शिवसेना आपल्या सोबत!"

शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि शेतीला व्यवसायिक रूप देण्यासाठी एकत्र यावे!

👉 शेतकरी उत्पादक कंपनीत सहभागी होण्यासाठी संपर्क करा

श्री. मदनजी रेनगडे पाटील

(शिवसेना जिल्हा प्रमुख, परभणी)